Bhagirathi
Mahila Sanstha
Address :

2113 E, Nimbalkar Colony, Near Rajesh Motors,
Opp. Axis Bank, Tararani Chowk, Kolhapur 416003

महिला आणि युवतींना मेहंदी काढण्याचा शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून दोन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होत. या कार्यशाळेत ब्रायडल मेहंदी आर्टिस्ट मा. रचना जोशी यांनी १०० पेक्षा अधिक महिला युवतींना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.

अलीकडच्या काळात लग्न हा सोहळा बनला आहे. यामुळे सध्या लग्नात मेहंदी काढणाऱ्या कलाकारांना चांगली मागणी आहे. या अनुषंगाने विविध डिझाईन्स, मेहंदी काढण्याचं तंत्र तसेच या क्षेत्रात करिअरच्या उपलब्ध होणाऱ्या संधी याबाबत मा. रचना जोशी यांनी मार्गदर्शन केले. तसेच मेंदीचा कोन कसा बनवावा, कोणती मेहंदी वापरावी, हाताच्या रचनेनुसार कोणते डिझाईन रेखाटावेत याबद्दल इत्यंभूत माहिती त्यांनी दिली.

काळाची गरज ओळखून मेहंदी काढणे हा सुद्धा अर्थार्जनाचा मार्ग होऊ शकतो. हे ओळखून या कार्यशाळेत सहभागी झालेल्या १०० महिलांनी या कार्यशाळेतून रोजगाराचे नाव दालन खुले झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.