2113 E, Nimbalkar Colony, Near Rajesh Motors,
Opp. Axis Bank, Tararani Chowk, Kolhapur 416003
भागीरथी महिला संस्था व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, रोटरी क्लब ऑफ गर्गीस, जितो कोल्हापूर चॅप्टर यांच्या वतीने महिलांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी "महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायद्यावरील मार्गदर्शन" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवून महिलांना मार्गदर्शन केले.
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवले आहे. रोजगार निर्मितीच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवले आहे. परंतु अलीकडील काळात महिलांच्या वरील वाढलेले अत्याचाराचे प्रमाण व सायबर गुन्हे वाढलेले दिसत आहेत. याबाबत महिलांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केले.
महिलांच्या वरील अत्याचारांमध्ये वाढ होत आहे. पोलीस दलाकडून गुन्हेगारावर नियंत्रण ठेवले जात आहे. परंतु अशा घटनांसाठी महिलांचे प्रबोधन व जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. महिलांच्या संरक्षणासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचं आहे. भागीरथी महिला संस्थेने महिलांना आत्मनिर्भर बनवण्याचं ध्येय ठेवलं आहे. अशाच पद्धतीने विविध संस्थांनी महिलांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा असे मत यावेळी व्यक्त केले.
यावेळी डॉ. धीरजकुमार बच्चू, श्री. रवींद्र कळमकर, सौ. सुवर्णा पत्की, श्री. पृथ्वीराज महाडिक, सौ. अंजली महाडिक, श्री. बी. एस. शिंपुकडे, सौ. माया राठोड, सौ. स्वीटी पोरवाल, सौ. योगिनी कुलकर्णी, सौ. लक्ष्मी शिरगावकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.