2113 E, Nimbalkar Colony, Near Rajesh Motors,
Opp. Axis Bank, Tararani Chowk, Kolhapur 416003
धनंजय महाडिक युवाशक्ती प्रणित भागीरथी महिला संस्था व भाजपा कोल्हापूर व यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या संकल्पनेतून कसबा बावडा येथे महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ व महिला मेळावा आयोजित केला होता. यावेळी उपस्थित राहून महिलांशी संवाद साधला. कृष्णराज महाडिक यांनी आयोजित केलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रम व महिला मेळाव्यास बावडा परिसरातील हजारो महिलांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी सहभागी झालेल्या महिलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेण्यात आले. या सर्व खेळांमध्ये महिलांनी आनंदाने, उत्साहाने सहभाग नोंदविला.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी केंद्र सरकारमार्फत देशातील महिलांसाठी अनेक योजना जाहीर करुन त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे. तसेच राज्यामध्ये महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लखपती दिदी योजना, अन्नपूर्णा योजना तसेच बचत गटाच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी भरीव असे योगदान दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातील माता-भगिनींनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच क्रांतिकारी पाऊल उचलत आले आहे. या सर्व योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य भाजपा कोल्हापूर व भागीरथी महिला संस्था करत आहे यापुढेही हे कार्य असेच सुरु राहील, असे मत यावेळी व्यक्त केले.