Bhagirathi
Mahila Sanstha
Address :

2113 E, Nimbalkar Colony, Near Rajesh Motors,
Opp. Axis Bank, Tararani Chowk, Kolhapur 416003

भागीरथी महिला संस्था व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड-टाऊन* यांच्यावतीने डॉ. मालती मोहनलाल दोषी हायस्कूल, वळीवडे येथे *वृक्षारोपणाचा* कार्यक्रम पार पडला. यावेळी क्लबच्या अध्यक्षा मा. सौ. अरुंधती महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली *'कळी उमलताना'* या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. मीरा कुलकर्णी यांनी मुली वयात येताना त्यांना कुठल्या समस्यांना तोंड द्यावे लागते, या वयात त्यांची मानसिक स्थिती कशी असते व ह्या आव्हानाला सामोरे जाताना आपण काय काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापक मा. मनोहर पवार, सेक्रेटरी मा. बी. एस. शिंपुकडे, मा. प्रतिभा शिंपुकडे (रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या सदस्या), मा. विजयलक्षी संबरगी(रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या सदस्या), मा. सुलोचना नार्वेकर, भागीरथी महिला संस्थेच्या सदस्या, मा. विजय खांडेकर, मा. वनिता खत्री, मा. लक्ष्मी खांडेकर, मा. पुनम सेलोनी या उपस्थित होत्या.