2113 E, Nimbalkar Colony, Near Rajesh Motors,
Opp. Axis Bank, Tararani Chowk, Kolhapur 416003
डॉक्टर दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक* यांच्या पुढाकारातून मोरया स्पेशलिस्ट हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आर के नगरमधील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये *'मोफत आरोग्य तपासणी शिबीर'* आयोजित करण्यात आले होते. तसेच शिंगणापूर येथील मातोश्री वृद्धाश्रमामध्ये दत्तकृपा क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर पार पडले. या *शिबिरांतर्गत वृद्धांना लागणारी एक महिन्याची औषधे मोफत देण्यात आली.
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्याच्या समस्या हा चिंतेचा विषय आहे. यासाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या माध्यमातून वृद्धाश्रमातील नागरिकांना निरोगी जीवन जगण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी केली आहे. यावेळी मा. बी. एस. शिंपूकडे, मा. प्रतिभा शिंपुकडे, मा. रूपाली चौगुले, मा. दिग्विजय पाटील, मा. साहिल शिकलगार, डॉ. सानिया धनवडे, डॉ. विजय पाटील डॉ. सुप्रिया पाटील, मा. शंकर पाटील, मा. जयश्री चौधरी, मा. दत्तात्रय आवळे, मा. सुवर्णा आवळे, मा. स्वाती कांबळे, मा. स्वाती पाटील, मा. संगीता बलाल, मा. स्मिता पाटील, मा. वैशाली राजशेखर, मा. सूर्यप्रभा चिटणीस, मा. शिवानी पाटील यांच्यासह रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन फिनिक्स सर्व सदस्य उपस्थित होते.